सोलापूर! घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा सराईत आरोपीस अटक 4 लाख 25 हजाराचा मुद्देमाल हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी



सोलापूर:

करमा तालुक्यांमध्ये घरफोड्यांचे सत्र काहीअंशी वाढले आहे या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा व करमाळा पोलीस पेट्रोलिंग करत असताना घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर बस स्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने त्या संशयित इसमाला ताब्यात घेऊन चोरीच्या गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, अन्य एक मोबाईल व कार 4 लाख 25 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून त्याच्या अन्य साथीदारांचा शोधही सुरू आहे. त्याच्याकडून आणखीही घरफोड्यांचे गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. अटक आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 461, 380, 457 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक फौजदार बीराजी पारेकर, पोलीस अंमलदार रवी माने, सलीम बागवान यांनी ही कामगिरी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments