प्रियकराने आरपीआयची पदाधिकारी असलेल्या प्रेयसीवर तब्बल ३० वार करुन निर्घृण हत्या



नाशिक दाेन खुनांच्या गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भाेगून बाहेर आलेल्या प्रियकराने आरपीआयची पदाधिकारी असलेल्या प्रेयसीवर तब्बल ३० वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना दिवाळीच्या दिवशीच गंगापूर राेडवरील संत कबीर नगर झाेपडपट्टीत घडली आहे. लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या दाेघांत आर्थिक वाद झाल्याने ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

पूजा संदीप आंबेकर (वय ३२, रा. संत कबीर नगर झाेपडपट्टी, नाशिक) असे आरपीआयच्या मृत महिला पदाधिकाऱ्याचे नाव असून संताेष विष्णू आंबेकर (वय ३७, रा. संत कबीर नगर)असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी दाेघांत पैशांच्या वादातून भांडण झाले. तेव्हा संतोषने धारदार चाकू काढून पूज्या हिच्या गालावर, पाेटावर आणि मानेवर तब्बल ३० वार केले. वर्मी घाव लागल्याने व अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गंगापूर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रियाज शेख यांच्यासह पाेलीस घटनास्थळी दाखल झाले.

Post a Comment

0 Comments