करमाळा हादरला! खडकी येथे चारित्र्याच्या संशायवरुन पत्नीने केला पतीचा खून

करमाळा तालुक्यातील खडकी येथे चारित्र्याच्या संशायवरुन राहत्या घरामध्ये डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीने पतीचा ठार केले आहे. पत्नी सुनिता गायकवाड हिने रागाच्या भरात पती सुदामराव शामराव गायकवाड (वय ५२ रा. खडकी ता. करमाळा डोक्यात दगडी पाटा घालून खून केला आहे. पत्नी सुनीता सुदामराव गायकवाड अटक करण्यात आली आहे. रावसाहेब शामराव गायकवाड (वय ४२, रा. खडकी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम गायकवाड हे आपल्या कुटुंबासह खडकी येथे राहतात सुदाम गायकवाड यांना तीन मुले आहेत. तिन्ही मुले मजुरी करण्यासाठी बाहेरगावी आहे. सुनिता ही पती सुदाम याच्यावर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होती. यातूनच रविवारी सकाळी सुनिता हिने पती सुदाम याच्या डोक्यात दगडी पाटा घातला होता. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना हा प्रकार समजला त्यानंतर सुदाम रक्ताच्या थारोळ्यात पडला.  तोंडावर गंभीर दुखापत झालेली दिसली. त्याला रुग्णवाहिकेतून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी उपचारापुर्वीच मृत घोषित केले.

सुदामच्या पत्नीला विचारले तेव्हा 'मीच दगडी पाटा तोंडावर मारुन त्यास जिवे ठार मारले आहे' असे सांगितले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 'तिने असे का केले याबाबत विचारले तेव्हा ती गप्प राहिली' असेही फिर्यादीत म्हटले आहे. सदर सुनिता गायकवाड यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments