बार्शी! पानगाव मधील टोळी चालकाला मुकादमाने ६ लाख ७५ हजारला गंडवले; दोघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील पानगाव मधील टोळी चालकाला मुकादमाने सहा लाख ७५ हजार आला गंडवले असून टोळी पाठवतो म्हणून एवढी रक्कम लाटली असून पाठवली ना फोन लागला आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच टोळी चालक सतिश गणपत हजारे (वय ४१) रा. पानगाव ता.बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश काळुराम राठोड रा. म्हैसमाळ पो. बेलोरा ता. पूसद जि. यवतमाळ
व बाळकृष्ण प्रकाश पवार रा. पिंपळगाव ता. मंगरुळपीर जि. वाशीम यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३४ व ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीच्या गावातील इतर ट्रक मालक हे ऊस वाहतुकीसाठी ऊस कारखाना सोबत करार करुन ऊसतोडीसाठी देत होते. त्यामुळे त्यांनी देखील जुन २०२० मध्ये बाणगंगा सहकारी साखर कारखाना लि.(आयान मल्टीट्रेड एल.एल.पी.युनिट-2) ईडा जवळा(नि) ता. भूम जि. उस्मानाबाद या कारखान्यासोबत माझी ट्रक नं. MH 25 U 5999 या गाडीचा करार करुन त्यांचेकडून ऊसतोड कामगारांसाठी उचलपोटी ४ लाख घेतले होते.

 फिर्यादी ऊसतोड मजूर मिळण्यासाठी गावातील विजय निवृत्ती काळे व अभीजीत बिभीषण काळे यांचे ओळखीने ऊसतोडीसाठी कामगार बाबत विचारपूस केली असता त्यांनी ऊसतोड कामगारांचे मुकादम गणेश काळुराम राठोड, रा. म्हैसमाळ पो. बेलोरा ता. पूसद जि. यवतमाळ व बाळकृष्ण प्रकाश पवार रा. पिंपळगाव ता. मंगरुळपीर जि. वाशीम यांची ओळख करुन दिली होती. त्यामुळे  गणेश राठोड व बाळकृष्ण पवार या दोघांना ऊसतोड कामगारांची टोळी मिळणेबाबत विचारणा केली असता त्यांनी १ टोळी(१० जोड्या) देतो असे सांगितले होते.

 त्यामुळे फिर्यादी त्यांचेसोबत बोलणी करुन प्रत्येक जोडीस 60,000/- रु. उचल व मुकादम यांना 75000/- रु कमिशन असा व्यवहार ठरला होता. दिनांक 05/07/2020 रोजी गणेश काळुराम राठोड व बाळकृष्ण प्रकाश पवार हे दोघे मौजे पानगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आमची बोलणी झाल्याप्रमाणे टोळी करीता डव्हान्स रक्कम द्या असे म्हणत होते. त्यामुळे मी पानगाव येथील घनशाम बाबुराव पवार यांचे हटेलमध्ये विजय निवृत्ती काळे व अभीजीत बिभीषण काळे यांचे समक्ष 1 ऊसतोड मजुरांची टोळी देणेबाबत करार करुन त्यांना 2,50,000/- रु. रोख दिले आहेत. त्यावेळी त्यांनी उर्वरीत रक्कम आम्ही लेबर मागतील तसे घेतो असे सांगून गेले होते. त्यानंतर बाळकृष्ण पवार यांनी आम्हाला कामगारांना उचल देवुन त्यांचे कोयते ठरवायचे आहे असे सागूंन त्यांनी मला बँक अकाऊंटवर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यामुळे मी बाळकृष्ण पवार यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे खाते क्र. 32553015931 या खात्यावर माझे फोन पे वरुन दिनांक 10/07/2020 रोजी 10,000/- रु. दिनांक 21/07/2020 रोजी 45,000/- रु. दिनांक 27/7/2020 रोजी 5,000/- रु. दिनांक 31/7/2020 रोजी 50000/- रु. दिनांक 17/8/2020 रोजी 80,000/- रु. दिनांक 19/08/2020 रोजी 15000/- रु. अशी रक्कम मागणी केल्याप्रमाणे पाठवली. त्यावेळी गणेश काळुराम राठोड व बाळकृष्ण प्रकाश पवार यांनी आम्ही ऊसतोड कामगार यांना उचल दिलेली आहे तरी अजून उर्वरीत रक्कम द्या असे सांगितले. त्यामुळे दिनांक 25/08/2020 रोजी मी खात्री करण्याकरिता म्हैसमाळ व पिंपळगाव येथे गेलो असता त्यांनी मला उसतोड मजुर १० कोयते(जोड्या) माझे समक्ष उभे करुन त्यांना उचल दिल्याचे सांगितले. 

त्यामुळे मी त्यांना त्यांचे गावी 50,000/- रु. माझा ड्रायव्हर बालाजी फूरडे रा. पानगाव याचे समक्ष दिले व उर्वरीत रक्कम कारखान्याकडून आल्यावर देतो असे सांगितले. त्यानंतर दिनांक 22/09/2020 रोजी बाणगंगा कारखान्याचे कर्मचारी यांनी मी कारखान्यासोबत केलेल्या कराराप्रमाणे टोळी केली किंवा नाही याची खात्री करण्यासाठी मला म्हैसमाळ व पिंपळगाव येथे घेवुन गेले असता मुकादम गणेश काळुराम राठोड व बाळकृष्ण प्रकाश पवार यांनी लावलेली टोळीतील लोकांना कारखान्याच्या कर्मचारी यांचे समक्ष हजर करुन कारखान्याच्या रजिस्टरवर त्यांची नावे, आधारकार्ड नंबर, सह्या घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी टोळी लावली असल्याची खात्री झाल्याने मुकादम गणेश काळुराम राठोड व बाळकृष्ण प्रकाश पवार यांनी उर्वरीत रक्कम द्या असे सांगितले. उसतोड कामगारांनी सह्या/अंगठे केल्यामुळे व टोळी लावल्याची खात्री झाल्याने मी त्याच दिवशी मुकादम यांना 1,00,000/- रु. ड्रायव्हर बालाजी फूरडे रा. पानगाव याचे समक्ष दिले व आम्ही परत आलो.त्यानंतर दिनांक 06/10/2020 रोजी मुकादम गणेश काळुराम राठोड व बाळकृष्ण प्रकाश पवार यांनी आमचे कमिशनचे पैसे पाठवा असे सांगितल्यामुळे माझा मित्र जाफर वस्ताद शेख रा. फुलेप्लट, बार्शी यांचे खात्यावरुन बाळकृष्ण पवार याचे खात्यावर 50,000/- रु. पाठविले व टोळीला कोठे जाऊ देवु नका असे सांगितले. त्यानंतर कारखान्याने 25 ऑक्टोबर पर्यंत टोळी कारखान्यावर हजर करा असे सांगितले होते. त्यामुळे मी बाळकृष्ण पवार यांना दिनांक 22/10/2020 रोजी फोन करुन 25/10/2020 पर्यंत टोळी घेवुन या असे सांगितले. त्यावेळी बाळकृष्ण पवार व गणेश राठोड यांनी कमिशनचे राहिलेले 20000/- द्या व टोळी घेवुन जा असे सांगितले. त्यामुळे मी त्याच दिवशी बाळकृष्ण पवार याचे खात्यावर 20000/- रु. ट्रान्सफर केले. त्यानंतर मी दिनांक 25/10/2020 रोजी मुकादम गणेश काळुराम राठोड व बाळकृष्ण प्रकाश पवार यांना टोळी आली किंवा नाही याबाबत त्यांचे फोनवर फोन केला असता त्यांचे फोन बंद लागत होते. त्यामुळे मी दिनांक 26/10/2020 रोजी म्हैसमाळ व पिंपळगाव येथे जाऊन पहाणी केली असता ते दोघेजण घरी नव्हते. मी टोळीतील उसतोड कामगारांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले कि, आम्हाला गणेश काळुराम राठोड व बाळकृष्ण प्रकाश पवार यांनी उचलीचे पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे आम्ही ऊसतोडीसाठी येऊ शकत नाहीत असे सांगितले. यावरुन माझी खात्री झाली की, गणेश काळुराम राठोड व बाळकृष्ण प्रकाश पवार यांनी माझ्याकडून ऊसतोड कामगारांना उचल म्हणून देण्यासाठी एकुण 6,00,000/- रु. व मुकादम कमिशन म्हणून 75000/- रु. घेवुन माझी फसवणूक केली आहे. तेव्हापासून मी वेळोवेळी गणेश काळुराम राठोड व बाळकृष्ण प्रकाश पवार यांचे घरी जाऊन माझे दिलेले पैसे परत मागत असुन ते घरी मिळून येत नाहीत. फोनवर बोललो असता काही दिवसांत देतो असे सांगून टाळाटाळ करीत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी आमचेकडे पैसे नाहीत, पैसे देवु शकत नाहीत असे सांगत आहेत. त्यामुळे मी सदर बाबत आज रोजी पोलीस ठाणेस येवुन तक्रार देत आहे. तरी दिनांक 05/07/2020 रोजीपासून ते आजतागायत इसम नामे गणेश काळुराम राठोड, रा. म्हैसमाळ पो. बेलोरा ता. पूसद जि. यवतमाळ व बाळकृष्ण प्रकाश पवार रा. पिंपळगाव ता. मंगरुळपीर जि. वाशीम यांनी मला बाणगंगा सहकारी साखर कारखाना लि.(आयान मल्टीट्रेड एल.एल.पी.युनिट-2) ईडा जवळा(नि) ता. भूम जि. उस्मानाबाद या कारखान्यास ऊसतोडीसाठी ऊसतोड कामगार 1 टोळी(10 जोड्या) देतो असे सांगून पानगाव येथे माझेसोबत करार करुन ऊसतोड मुजरांना देण्यासाठी माझेकडून वेळोवेळी 6,00,000/- रु व मुकादम कमिशनपोटी 75,000/- असे एकुण 6,75,000/- रु. घेवुन ऊसतोड मजुर न पुरवता व माझी पैसे परत न देता माझी 6,75,000/- रु. आर्थीक फसवणूक केली आहे. 

त्याचा अधिक तपास बार्शी पोलीस करत आहेत अशी माहिती बार्शी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments