पंकजांचा सल्ला फडणवीसांना रुचला नाही..


सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी आता विरोधकाच्या भूमिकेत काम करा, असा सल्ला भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील नेत्यांना दिला आहे. मात्र पंकजा यांनी दिलेला हा सल्ला विरोधी पक्षनेते फडणवीसांना अजिबात रुचलेला नाही. यासंदर्भातील प्रश्न विचारताच फडणवीसांनी पत्रकार परिषद गुंडाळली.

उठसुट सत्तेची स्वप्न पाहणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला उत्तर दिले. त्यांना मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली. जनतेन भाजपला नाकारले नव्हते तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारल होत असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, भगवान गडावर आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाकडे पत्रकारांनी लक्ष वेधलं असता फडणवीस काही न बोलताच पत्रकार परिषदेतून निघून गेले.

मी माझ्या पक्षाच्या लोकांनाही सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असं सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय, सरकार पडणं आणि सरकार खंबीर असणं आमचं ध्येय नाही तर जनतेसाठी काय करतात ते सांगा.

राज्यातल्या काही मंत्र्यांना वसुलीचं सॉफ्टवेअर देण्यात आलं आहे. कोणाकडून किती वसुली करायचं याची नोंद त्यामध्ये ठेवली जाते. अलीकडेच राज्यात पडलेल्या आयकर विभागाच्या छाप्यातून हे पुढे आले आहे. राज्यात प्रचंड दलाली सुरू आहे. ती इतक्या थरावर सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Post a Comment

0 Comments