.... प्रसिद्धीप्रमुख पदी ताजुद्दिन बाबा शेख यांची निवड


वैराग/प्रतिनिधी:

वैराग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ताजुद्दिन बाबा शेख यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी ताजुद्दिन बाबा शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सोलापूर जिल्हाध्यक्ष जाकीर हुसेन इस्माईल शेख यांनी केली आहे.

सामाजिक कामात अग्रेसर असणारे ताजुद्दिन बाबा शेख यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. आंदोलने, उपोषण आणि सामाजिक उपक्रम यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात. ताजुद्दिन बाबा शेख यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यांच्या निवडीचे तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments