‘पाया पडतो पण रिषभपासून दूर राहा’; नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ‘या’ अभिनेत्रीला ट्रोल


 उर्वशी रौतेला नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी उर्वशी आणि रिषभ पंतमधील वादामुळे चर्चा रंगली होती. आता पुन्हा ती रिषभच्याच कारणाने चर्चेत आलीये. तिने रिषभ पंत ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ज्यावरून ती पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

उर्वशी आणि रिषभ यांच्या अफेअरची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. त्यानंतर त्यांच्यात भांडणे झाली आणि ते दोघं वेगळे झाले होते. त्यानंतर उर्वशीने रिषभच्या एका पोस्टवर रिषभने तिला ब्लॉक केलं असल्याची कमेंट केली होती. ज्यावरून त्या दोघांमधील वाद जगासमोर आला होता. तेव्हापासून उर्वशी आणि रिषभ या दोघांच्या नात्यात कडवटपणा निर्माण झाला होता.

रिषभचा नुकताच २४ वा वाढदिवस पार पडला. उर्वशीनेही ट्विट करून रिषभ वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्या शुभेच्छानंतर मात्र सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला लागला. काहिंनी तिला रिषभपासून दूर रहा म्हणून सांगितलयं तर काहिंनी आम्हाला माफ कर असं लिहीलं तिला ट्रोल केलं आहे.

रिषभने ब्लॉक केल्यानंतरसुद्धा उर्वशीने अनेकवेळा सोशल मीडियावर रिषभवर काही ना काही पोस्ट केल्या आहेत. त्यानंतरही रिषभने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. तरीही उर्वशीने रिषभला दिलेल्या शुभेच्छांमुळे उर्वशी ट्रोल झाली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी अनेकवेळा उर्वशीला रिषभ पासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Post a Comment

0 Comments