जाधव कुटुंबाला प्रहारचा आधार; राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मदतीने रामा जाधव यांच्या पुणे येथे उपचार सुरू


[ नागनाथ नरुटे पाटील यांच्या प्रयत्नांना यश ] 

परंडा/ प्रतिनिधी:
 
टाकळी येथे वडार समाजातील मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मिळावा यासाठी संजय रामा जाधव हे  आंदोलन करण्यासाठी परंडा येथे आले होते. आंदोलन झाल्यानंतर घरच्यांना भेटून ते पुण्याला जात असताना दौंड येथे ट्रक व मोटरसायकल यांचा अपघात झाला. त्या अपघातांमध्ये संजय रामा जाधव हे गंभीर जखमी झाले. 

ही बातमी त्यांच्या घरी आई वडिलांना समजल्यानंतर ते हॉस्पिटलच्या खर्चासाठी परंडा शहरातील महालक्ष्मी मनी ट्रान्सफर येथे पैसे काढण्यासाठी आले असता, आई रडत असल्याचे दिसले तिथे उपस्थित असलेले प्रहार चे तालुकाध्यक्ष नागनाथ नरुटे पाटील, प्रहार युवाध्यक्ष महेश्वर खराडे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब तरटे व अखिल भारतीय छावा संघटना तालुका अध्यक्ष भरत ननवरे उपस्थित होत,त्यांनी माहिती घेतली असता आईने सविस्तर माहिती सांगितली, त्यानंतर प्रहारचे तालुकाध्यक्ष नागनाथ नरुटे पाटील यांनी  माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू व प्रहारचे दौंड येथील कार्यकर्त्यांना ला कॉल करून घटनेची माहिती दिली व येथील प्रहार कार्यकर्त्यांना  पिरॅमिड हॉस्पिटल येथे जाधव यांना ऍडमिट करण्यास सांगितले.नागनाथ नरुटे पाटील एवढ्यावर न थांबता  स्वतःची दुचाकी काढून स्वतःचे दौंड येथे गेले व तेथून जाधव यांना  पुण्यातील मोरया हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.

हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांशी चर्चा केली असता संजय रामा जाधव यांच्या मेंदुला गंभीरच्या दुखापत झाली आहे, व त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागेल असे डॉक्टरांचे म्हणणे आल्यानंतर, शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च जवळपास अंदाजे पंधरा लाख रुपये माफ करावे अशी विनंती केली. त्यावेळेस राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे निकटवर्तीय, वाहन चालक अशोक गव्हाणे यांनी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू व डॉक्टरांशी फोनवरून बोलणे घडवून आणले डॉक्टरांनीही ते ऑपरेशन मोफत केले.
यानंतर जाधव कुटुंबीयांनी
राज्यमंत्री बच्चुभाऊ यांचे पीए गौरव भाऊ जाधव तसेच पुणे रुग्णसेवक नयन पुजारी,मयूर काकडे,
प्रहार परंडा तालुका अध्यक्ष नागनाथ नरुटे पाटील, प्रहार युवक अध्यक्ष महेश्वर खराडे, अशोक गव्हाणे, पुण्यातील मोरया  मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे प्रमुख डॉक्टर अजित पाटील साहेब यांचे आभार मानले.
प्रहार संघटनेने दाखवून दिले आहे की आंदोलनात रस्त्यावर उतरूनच नाही तर समाजातील तळागाळातील जनतेला न्याय व आधार  देऊ शकते दाखवून दिले आहे.

Post a Comment

0 Comments