मुंबईत झालेल्या कार्डेलिया क्रुझ पार्टीवर टाकलेल्या छाप्यात बॉलीवूड किंगखानच्या मुलाला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादीबरोबरच बॉलीवूडच्या एका गटाने एनसीबीवर संशय व्यक्त केला आहे. आर्यनला मुद्दाम ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचं या गटाचं मत आहे.
आर्यनकडे ड्रग्ज सापडले नसले तरी त्यासंबंधीचं संभाषण सापडलं आहे. यामुळे एनसीबी आर्यनला सोडत नाही तर दुसरीकडे शाहरुख त्याला सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. पाकिस्तानमधील सेलिब्रिटी आणि अभिनेते या प्रकरणी शाहरुख खानचे समर्थन करत आहेत. पाकिस्तानचा प्रसिद्ध अँकर वकार जाका याने ट्विट करत शाहरूखला समर्थन दर्शवले आहे. शाहरुख खान सर तुम्ही भारत सोडून कुटूंबासोबत पाकिस्तानात येऊन स्थिर व्हा. मोदी सरकार तुमच्या कुटूंबासोबत जे करत आहे ते अत्यंत चुकीचं आहे, मी शाहरुखानसोबत उभा आहे.’ असं ट्विट जाकाने केलं आहे. या ट्विटमुळं तो ट्रोल देखील झाला आहे.
अनेकांनी जाकाच्या या ट्विटचं समर्थन केलं आहे तर काहींनी त्याची खिल्ली उडवली आहे. काही युजर्सने पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीची दयनीय अवस्था सांगितली आहे. फुकरान नावाच्या एका युजरने म्हटलं आहे की, शाहरुखला इथं सिनेमे मिळणार नाहीत. सर्व प्रोड्युसर एकत्र येऊन पण त्याची फी देऊ शकणार नाहीत. एका युजरने म्हटलं आहे की, शाहरूखची पत्नी हिंदू आहे आणि ते हिंदूंचे सर्व सण साजरे करतात. जो व्यक्ती पत्नीच्या धर्माचादेखील आदर करतो तो एक खरा माणूस आहे.
0 Comments