महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल


 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य पातळीवरील पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत आक्रमक विरोधी पक्षाचे हल्ले परतवून लावण्याची जबाबदारी अतुल लोंढे  यांच्याकडं देण्यात आली आहे. त्याची पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची रचना करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचं वाटप केलं आहे. माध्यम आणि संवाद विभाग समितीमध्ये मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासोबतच सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही समावेश आहे. अध्यक्ष व मान्यवरांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

आघाडी संघटना, विभाग व सेल या विभागाच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर हे सहप्रमुख असतील. तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत वंजारी हे सहप्रमुख व प्रदेश सरचिटणीस माजी दिप्ती चवधरी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ईडीची पुढची कारवाई अशोक चव्हाणांवर?
निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments