बार्शीपुत्र विनोद कांबळेंचा दिल्लीत सन्मान


बार्शी/प्रतिनिधी:

 बार्शी नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा आणि दिग्दर्शक विनोद कांबळे यांनी आज दिल्लीत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्याहस्ते सन्मान स्वीकारला. त्यांच्या कस्तुरी या हिंदी बालचित्रपटाला यंदाचा ६७ वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता. आज राजधानी दिल्ली येथे शानदार सोहळ्यात बार्शीपुत्राने हा पुरस्कार स्वीकारला. 

बार्शीसह सोलापूर जिल्ह्याचं नाव विनोद कांबळे यांनी आपल्या कर्तृत्वाने देशभर झळकावलं आहे. त्यामुळे, बार्शीसाठी हा क्षण अभिमानाचा आणि बार्शी तिथं सरशी हे सिद्ध करणारा आहे.

Post a Comment

0 Comments