बार्शी/प्रतिनिधी:
नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्लास्टिक संकलन व योग्य विल्हेवाट या कार्यक्रमाचे पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नियोजन करण्यात आलेले होते, त्याअंतर्गत परंडा तालुक्यातील विविध गावांमध्ये प्लॅस्टिक संकलन करण्यात आलेले आहे.
१२ ऑक्टोबर रोजी ग्लोबल एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये ग्लोबल विद्यालय पिंपरखेड या शाळेमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे ग्लोबल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष माननीय गोरख मोरजकर, सचिव आशाताई मोरजकर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग व विद्यार्थी यांनी या उपक्रमास सहभाग नोंदवला प्लॅस्टिक संकलन करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.
0 Comments