परांडा हादरला! टाकळी गावातील ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार


परांडा/प्रतिनिधी:

परांडा तालूक्यातील टाकळी येथे दळन आनन्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संताप जनक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी प्रकाश बारसकर विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार व बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी येथील ११ वर्षीय मुलगी दळन आणण्यासाठी पिठाच्या गिरणीत जात असताना आरोपी प्रकाश बारसकर याने मुलीच्या हताला धरून बाजुच्या कापूस पिकात ओढत नेहले व तोंड दाबुन बलात्कार केला. घाबरलेल्या पिडीत मुलीने झालेली घ घटना घरी सांगीतल्याने आरोपी विरूद्ध परंडा पोलिसात फिर्याद देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य ओळखून परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गीडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे, आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बिराजदार हे करत आहेत. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता सदर घटने चा निकाल जलदगती न्यायालयात लावून आरोपी फाशी शिक्षा देण्यासाठी विविध संघटना मार्फत तहसील कार्यालयाला निवेदनही देण्यात आली.

Post a Comment

0 Comments