बार्शी! गुळपोळी येथील शेतरस्त्याचे वाद सामंजस्याने मिटवा - सूर्यकांत चिकणे


बार्शी/प्रतिनिधी:
     
 गुळपोळी येथील शेतरस्त्याबाबत वाद निर्माण झाले आहेत, शेतकरयांचे शेतात जाणयासाठी येणयासाठी वाद निर्माण झाले आहेत. वाद सामंजस्याने मिटविणेबाबत तहसीलदार  सुनिल शेरखाने व पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांची समक्ष भेट घेउन सदरचे वाद सामंजस्याने मिटविणेबाबत निवेदनात केली.

 सूर्यकांत गोविंद चिकणे यांनी  गुळपोळी येथील शेतात जाणयाच्या येण्याच्या रस्त्याच्या कारणावरून मोठ मोठे वाद निर्माण झाले आहेत ते वाद मिटविणेबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक बार्शी तालुका पोलीस स्टेशन शिवाजी जायपतरे  यांनी गुळपोळी येथे येवून ,ज्या शेतकरयांची रस्त्याबाबत मागणी आहे ,व ज्यांचे शेतातून रस्ता जाणार आहे ,अशा शेतकरी यांची गुळपोळी गावात बैठक लावून सामंजस्याने मिटविणेबाबत विनंती केली आहे, सूर्यकांत चिकणे यांनी ,कारण यापुर्वी गुळपोळी गावात शेतातील बांधावरून भांडण होऊन खुन मारामारया झाल्या आहेत. गुळपोळी गाव हे संवेदनशील गाव आहे तशी पोलीस स्टेशनला नोंद आहे ,सुनिल सावंत, नागनाथ फोके,तुकाराम चिकणे, सिराज शेख, उस्मान शेख,यशवंत चिकणे, उत्रेश्वर चिकणे यानी रस्तायाबाबत मागणी केली आहे यांची व त्यांचे संबंधीत शेतकरी यांचेत सामंजस्याने रस्त्याबाबतचे वाद आपण मिटवावे अशी मागणी सूर्यकांत चिकणे यांनी केली आहे.
       
सदर रस्त्याबाबतचे वाद सामंजस्याने मिटविल्यास पुढील होणारे भांडण तंटे टळतील अशी अपेक्षा मा तहसीलदार व पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांचेकडून सूर्यकांत चिकणे यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments