"शिवसेनेला टिकायचे असेल तर उद्धव ठाकरेंनी सरकारच्या बाहेर पडायला हवं”


भाजपसोबतची युती तोडत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष भाजपने हे सरकार पडणार असल्याचं वारंवार सांगितलं. मात्र अद्यापही सरकार टिकुन आहे. अशातच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना सरकारच्या बाहेर पडायला सांगितलं आहे.

(Advertise)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाही ही चांगली गोष्ट आहे. परंतू मुख्यमंत्र्यांनी घराच्या बाहेर न पडता आता सरकारच्या बाहेर पडावं. सरकारच्या बाहेर पडत त्यांनी पुन्हा भाजप आणि आरपीआयसोबत यावं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

(Advertise)

शिवसेना वाचवायची असेल तर त्यांनी आपल्या निर्णयात बदल करायला हवा. अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर एकत्र येऊ शकतात, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तुम्ही एकत्र आलात तर तुम्ही शांतपणे राज्याचा कारभार करा. लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. लोकांचे प्रश्न बाजूला राहिले आणि त्यांचं लक्ष पंतप्रधान नरेंद्री मोदींकडे आहे, असंही आठवले म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदींवर काहीतरी आरोप करायचा आणि त्यातच आपलं समाधान मानतात. हे सरकार जावं आणि आमचं महायुतीचं सरकार यावं, असा नारा पुन्हा एकदा आठवलेंनी दिला आहे. यावर आता शिवसेनेची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments