बार्शी ! पिंपरी (आर) येथे जुगार अड्ड्यावर छापा सात जणांविरुद्ध वैराग पोलीस स्टेशन गुन्हा दाखल


वैराग/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील पिंपरी आर येथे बावन पत्त्याचा जुगार खेळत असताना वैराग पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारुन सात जनावर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी आर येथील समाज मंदिराशेजारी बावन पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार खाजगी वाहनाने जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता, गावातील ७  लोक गोलाकार बसून बावन पत्त्याचा जुगार खेळताना आढळून आले, पंचा  समक्ष त्यांची झाडाझडती घेतली असताना त्यांच्याकडून १ हजार पाचशे दहा रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

मुंबई जुगार ऍक्ट १२ (अ) नुसार रमेश मधुकर लंगोटे(३६) रामेश्वर प्रकाश पाटील (४२) सुहास विठ्ठल लंगोटे (३०) बाबू सुरेश लंगोटे (३९), खंडू मनमोहन लंगोटे (३४),शहाजान आसिफ मुलाणी (५०) परमेश्वर प्रकाश पाटील (३६) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments