स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाचा महिलेबरोबर गैरव्यवहार; पोलिसात गुन्हा दाखलनांदेड जिल्ह्यामध्ये सदरील घटना घडली आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाने आपल्याच संघटनेत असलेल्या प्रदेश उपाध्यक्षाच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघड झाला आहे. नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात माधव देवसरकर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

माधव देवसरकरने सिडको भागातील संघटनेत काम करणाऱ्या एका मित्राच्या पत्नीला डोळा मारणे, फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट वारंवार पाठवून रात्री अपरात्री कॉल करून गैरवर्तन केले आहे.

पतीच्या माध्यमातून देवसरकरला सांगूनही गैरवर्तन थांबले नसल्यामुळे ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. मात्र, देवसरकर हे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे सवस्थापक अध्यक्ष असल्याने ग्रामीण पोलिसांनी तक्रार घेण्यास एक टाळाटाळ केली. अखेर पत्रकार परिषद घेतल्याने मात्र पोलिसांचे धाबे दणाणल्याने आज ग्रामीण पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments