पंतप्रधान मोदीचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस कोल्हापूर मध्ये साजराकोल्हापूर/प्रतिनिधी:

देशातील वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला जात आहे.

याच अनुषंगाने  आमदार पी. एन. पाटील  व युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, पक्षनिरिक्षक सुमित भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार करवीर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने उच्चशिक्षित बेरोजगार युवकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी योगेश कांबळे , सचिन चौगले , डॉ. लखन भोगम, प्रकाश संकपाळ, अक्षय इंद्रेकर, निखिल देवणे, सचिन बेडेकर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments