जलदिंडी आणि वृक्षारोपनाने जल साक्षरता आठवड्याचा शुभारंभ



जलसंजीवनी प्रकल्पाचा उपक्रम : महिला उत्पादक कंपनीच्या कार्यालय व शेतमाल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

बार्शी : “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरी आम्हा सोयरे” या संत तुकाराम महाराजांचा अभंग प्रत्येकाला वृक्ष संपदेचे , निसर्गाचे महत्व पटवून देतो. हेच महत्त्व जाणून जलसंजीवनी प्रकल्पाने जल साक्षरता आठवड्याची सुरुवात केली आहे . बार्शी तालुक्यातील रस्तापूर, उंडेगाव, इर्ले, यावली, सुर्डी या पाच गावात जलदिंडी आणि वृक्षारोपन कार्यक्रमाने या आठवड्यास सुरुवात झाली आहे . सुर्डी येथील कार्यक्रमाने पाच गावातील जलदिंडी कार्यक्रमाने पहिल्या दोन कार्यक्रमाचा टप्पा पूर्ण झाला.
या कार्यक्रमास युनायटेड वे मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक मुकेश देव, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे, कार्यक्रम संचालक किशोर सुतार, जलसंजीवनीचे व्यवस्थापक, भिमाशंकर ढाले, सुर्डीचे प्रा. मधूकर डोईफोडे, विनायक डोईफोडे, भोगावती कंपनीच्या अध्यक्षा निता शेळके, कार्यक्रम अधिकारी समीर शेख, अजिज तांबोळी, अनुराधा गायकवाड, सर्व संचालक मंडळ, पाच गावचे सरपंच, समिती अध्यक्ष आदी उपस्थित होते.

युनायटेड वे मुंबई यांच्या संकल्पनेतून आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या अमलबजावणी मध्ये जलसंजीवनी प्रकल्प ऑगस्ट २०१८ पासून कार्यरत आहे. बार्शी तालुक्यातील पाच गावात प्रकल्प विविध विभागात कार्य करत आहे . मृदा व जलसंधारणाचे काम शाश्वत व निरंतर राहण्यासाठी जल साक्षरता आठवड्‌याची सुरुवात करण्यात आली आहे . पाच गावात जलदिंडी आणि २००० वृक्षारोपन करण्यात आले आहे.

जलसाक्षरता सप्ताहमधील उपक्रम

जलदिंडी
वृक्षारोपण
कुटुंब पाणी मूल्यमापन
निबंध व घोषवाक्य स्पर्धा
पाण्यावर चर्चासत्र
खेळाच्या माध्यमातून समज विकसित करणे
भितीचित्राच्या माध्यमातून जनजागृती

भोगावती कंपनीच्या शेतमाल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

जलसंजीवनी प्रकल्पा अंतर्गत स्थापन भोगावती जलसंजीवनी कृषी विकास महिला उत्पादक कंपनी कार्यालय व शेतमाल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करण्यात आले . या कंपनीचे ४४० महिलांचे सभा सभासदत्व स्वीकारले असून कंपनी विविध व्यवसायच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा पुरवत आहे.

Post a Comment

0 Comments