कोरोनामुक्त अन लसीकरणयुक्त बार्शी करूया : आमदार राजेंद्र राऊत


नगरसेवकांनाही पुढाकार घेण्याचं आवाहन

बार्शी/प्रतिनिधी:

 शहर व तालुक्यात आज कोरोनाच्या ३० हजार लसी उपलब्ध झालेल्या आहेत. हा मेगा लसीकरण कार्यक्रम बार्शी शहरात १० लसीकरण केंद्रांवर व तालुक्यातील ग्रामीण भागात ५० लसीकरण केंद्रांवर राबविण्यात येत आहे.  शहरातील लिंगायत बोर्डींग येथील लसीकरण केंद्रांवर आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट दिली. त्यावेळी, कोरोनामुक्त आणि लसीकरणयुक्त बार्शी करण्याचं ते म्हणाले.

आत्तापर्यंत बार्शी शहर व तालुक्यात १ लाख ४० हजार नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला असून, आज देण्यात येणारे ३० हजार डोस असे मिळून १ लाख ७० हजार नागरिकांना कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण होणार आहे. नोव्हेंबर २०२१ अखेर पर्यंत २ लाख ६६ हजार नागरिकांचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून प्रशासन, आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

यावेळी या लसीकरण केंद्रावर नगरसेवक विलास आप्पा रेणके, प्रशांत कथले मालक, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक, आप्पासाहेब गुडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments