आठ लाखांचे काळ्या बाजारासाठी विक्री करण्याकरता नेले जात असलेले डिझेल, टँकर व दोन आरोपी बार्शी शहर पोलिसांच्या ताब्यात


बार्शी/प्रतिनिधी:
 
दि ११ सप्टेंबर रोजी पाच वाजण्याच्या दरम्यान हिंदुस्तान बेकरी जवळ टाटा कंपनीच्या एम .एच. ०४ केएफ १८३१ टँकरमधून आठ लाख पाच हजार पाचशे रुपये किमतीचे नऊ हजार लिटर डिझेल ची कोणताही डिझेल वाहनाचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या डिझेलची काळ्याबाजारात विक्री करण्याकरता घेऊन जात असताना आरोपी क्रमांक १) प्रदीप समर बहादुर (वय २९) व्यवसाय ड्रायव्हर पालघर २) पवन रामचन्द्र तिवारी (वय ३७) कमलीनगर चाळ, नालासोपारा ३) विठ्ठल पीठआरे वाकड पुणे  ४) मनोज होनमाने  माळीनगर, अकलूज पोलीस नाईक लक्ष्मण भांगे यांच्या फिर्यादीवरून चालक व वाहक यांना ताब्यात घेतले आहेत.

 पुढील तपास बार्शी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर उधार हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments