करमाळा! महावितरणने तात्काळ वीज तोडणी थांबवावी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ



शेतकऱ्यांनी बंद पाडले वाशिंबे येथील वीज उपकेंद्र

विज बिल भरून अद्यापही चार महिने पूर्ण झालेले नसताना महावितरणच्या वीज कनेक्शन कट करण्याच्या तालिबानी धोरणाच्या विरोधात आज वाशिंबे तालुका करमाळा येथील शेतकऱ्यांनी वाशिंबे येथील वीज उपकेंद्र बंद केले.

वाशिंबे परिसरातील दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी आज सब स्टेशन बंद करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. आम्ही वीज बिल भरू शकत नाही त्यामुळे पूर्णपणे लाईट बंद राहू द्या, ज्या वेळी आमच्याकडे पैसे येतील तेव्हाच भरू व नंतरच लाईट चालू करा, तोपर्यंत आम्ही अंधारातच राहू असे ठणकावून सांगितले.

सध्या कोणत्याही शेतमालाला भाव नाही, उसाची एफ.आर.पी येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विकलांग झाला आहे. त्यामुळे आम्ही वीजबिल भरू शकत नाही. विजबिल भरेपर्यंत लाईट कसली सोडू नका असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पर्यायाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आज वाशिंबे उपकेंद्रा वरील गावठाण फिडर सह शेतीपंपाचे फिडर बंद ठेवले आहेत. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब झोळ, माजी सरपंच प्रताप झोळ यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments