नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपची जनआशीर्वाद यात्रा ; शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची रणनीती


केंद्रीय मंत्री उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात जनआशीर्वाद यात्रा भाजप काढणार आहे. १६ ऑगस्टपासून ही जनआशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. मुंबई ते कोकण अशी ही जनआशीर्वाद यात्रा असणार आहे. या यात्रेत देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरही सहभागी होणार आहेत. यामागचा हेतू हा मुंबई आणि कोकणात शिवसेनेला लक्ष्य करण्याचा आहे, असं बोललं जातंय. दिल्लीमध्ये नुकतीच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची बैठक पार पडली.

नारायण राणे हे गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री झाले आहे. त्यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम हे मंत्रालय देण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहेत. यामुळे जनआशीर्वाद यात्रेतून नारायण राणे आणि भाजपकडून महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन केले जाईल, अशी शक्यता आहे.


दरम्यान, भाजप नेत्यांची दिल्लीतील बैठक संपली आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवानात त्यांची बैठक झाली. याबैठकीनंतर फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

Post a Comment

0 Comments