कृषिदूत गीता कदम कडून सुर्डीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन


सुर्डी / प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या अडीअडचणी ओळखाव्यात,आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे हस्तांतर करावे रोजगार आणि कौशल्य सुनिश्चित करण्यासाठी उद्योजकता वाढवावी, ही उद्दिष्टे ठेवून सुर्डी ता.बार्शी येथील कृषिकन्या गीता कदम शेतकऱ्यांना बांधावर जाऊन त्यांच्या दैनंदिन समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करत आहे.

एच.एच.एस.एस.एम.एस. कृषि महाविद्यालय मालेगाव कृषि विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेली गीता कदम बार्शी तालुक्यातील सुर्डीची रहिवासी आहे. कोरोना काळातील सुट्टीच्या या कालावधीत तिने आपल्या शिक्षणाचा गावांमध्ये जाऊन डिजिटलायझेशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंऋज्ञानाबद्दल मार्गदर्शनासाठी केला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या फुलेजल, किसान सुविधा, ग्रामसेवा, अॅग्रीमार्केट, कृषिफाय आदी अॅप्सचे फायदे तसेच शेती क्षेत्रात अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या फायद्याबाबत मार्गदर्शन करीत आहे.
या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालय मालेगावचे प्राचार्य डॉ.पी.ए. तुरबटमठ.डाॅ.एस.ए.राऊत, उपप्राचार्य पी.के. सुर्यवंशी कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.व्ही.आहिरे. प्रा.एस.व्ही. बागल प्रा.जी.एस. बनसोडे.‌प्रा एस.के.उदमले.यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments