‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरातच्या नखरेल अदा, सोशल मीडियावर जबराट हवा


    
 फँड्री चित्रपटामध्ये ‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. 
मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात  नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. तिच्या या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. तिच्या या व्हिडीओ आणि फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. चाहते तिचं कौतुक करत आहेत.
राजेश्वरी खरातच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते. 
त्यामुळे तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये अहमहमिका रंगलेली असते. चाहते आपल्या लाडक्या शालूचे फोटोही मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या वॉलवर शेअर करतात. त्यामुळे तिच्या फोटोवरील कमेंटमधल्या ‘शेरां’सोबत सव्वाशेरांनी केलेल्या शेअर्सची संख्याही सव्वाशेच्या घरात जाते.

Post a Comment

0 Comments