महाराष्ट्राला हादरवणारी घटना!महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना चंद्रपुर तालुक्यात घडली आहे. अंधश्रद्धेला बळी पडत एका कुटुंबाला गावकऱ्यांनी अमानुष मारहाण केली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या तालुक्यातील तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवरील वणी खुर्द गावात ही संतापजनक घटना घडली आहे. गावात भानामती करण असल्याचा आरोप करत गावातील चार महिला व तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत सात जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

गावातील दोन- तीन महिलांच्या अंगात देवी आली होती. त्यावेळी या महिलांनी या कुटुंबातील पुरुष व महिलांनी गावावर भानामती केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर महिलांनी नावं घेतलेल्या सर्वांना गावकऱ्यांनी एका चौकात आणलं व खांबाना सर्वांचे हातपाय बांधत बेदम मारहाण केली. चार महिला आणि तीन वृद्धांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. 

पोलीसांना या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पिडीतांना गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले आहे. या पिडीत सात व्यक्तींपैकी पाच व्यक्तींना जिल्हा सामान्या रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. या सर्व प्रकारांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

1 Comments

  1. अंगात देव येणे आणि देवाच्या नावाखाली लोकांना नाहक त्रास देने ह्या सगळ्या फालतु अंधश्रद्धा आहेत

    ReplyDelete