बार्शी! पानगावपुत्र शहीद सुनील काळे यांना मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पोलीस पदक जाहीर


बार्शी - पानगावचे भूमिपुत्र शहीद जवान सुनील काळे यांना मरणोत्तर राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. देशात शौर्यपदक श्रेणीत २ राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्रात एकमेव बार्शीपुत्र शहीद सुनील काळे यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. बार्शीकरांसाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.

दरम्यान, गतवर्षी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण प्राप्त झाले होते. १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला शौर्य पदक आणि पोलीस सेवा पदकांची घोषणा झाली. त्यामध्ये, शहीद सुनील काळे यांना मरणोत्तर राष्ट्रपदी शौर्य पोलीस पदक आणि पोलीस सेवा पदक असे २ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Post a Comment

0 Comments