बार्शी तालुक्यातील सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा : आमदार राजेंद्र राऊत


बार्शी/प्रतिनिधी:

बुधवार दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी या. जिल्हाधिकारी मिलिंदजी शंभरकर साहेब यांच्याशी पत्र व्यवहार करून खरीप हंगाम सन २०२१-२२ मधील, बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकांचे झालेले नुकसान याबाबत माहिती देऊन, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे या विषयासंबंधी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी सतत फोनवर संपर्कात होतो.

या पाठपुराव्यामुळे बार्शी तालुक्यातील सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२१-२२ प्रतिकूल परिस्थिती जोखीम अंतर्गत सोयाबीन पीक विमा धारक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून २५% आगाऊ नुकसानभरपाई रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांनी आज पारित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments