'गोकुळ केसरी' कुस्ती स्पर्धा सुरू करण्यासाठी मंत्री हसन मूश्रीफ यांच्याकडे घातले साकडे


कोल्हापूर / प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षा पासून बंद असलेली 'गोकुळ केसरी' कुस्ती स्पर्धा सुरू करण्यासाठी 'कुस्ती हेच जीवन महासंघ' व जिल्ह्यातील तमाम कुस्ती प्रेमी तर्फे ग्रामविकास मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांना साकडे घालण्यात आले. सहकार क्षेत्रात देशभर नाव कमावलेल्या गोकुळ दूध संघाने अनेक वर्षे मानधन धारक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून कुस्ती क्षेत्राला सैदेव मोठे पाठबळ देण्याचे काम केले आहे. पण गेल्या काही वर्षांपासून ही स्पर्धा बंद झाली असून यामुळे कुस्ती क्षेत्राचे खुप मोठे नुकसान झाले आहे. एकतर जत्रे यात्रेतील कुस्ती मैदाने बंद असल्यामुळे सर्व पैलवान मंडळींना खुराकासाठी खुप तारेवरची कसरत करावी लागत आहे. जर हीच परिस्थिती काही महिने राहिली तर जिल्ह्यातील सर्व तालमी व आखाडे ओस पडतील व आपली रांगडी कुस्ती संपून जाईल. 

 हीच गोष्ट लक्षात घेऊन  जिल्ह्यातील बंद पडलेली कुस्ती मैदाने व कुस्ती स्पर्धा सुरू करण्यासाठी अनेक पैलवान व वस्ताद मंडळीं एकत्रित आली असून गोकुळ सारखी मोठी मानाची कुस्ती स्पर्धा सुरू करण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ यांना साकडे घालण्यात आले आहे. तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातर्फे मानधनक कुस्ती स्पर्धेची सुरुवात करावी यासाठी कुस्ती हेच जीवन महासंघ तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार, तानाजी गवसे वस्ताद, श्री. अशोक सातुसे  (साके) ,आंतरराष्ट्रीय खेळाडू  सुनील पाटील व भरत पाटील (सोनगे),  दत्ता पाटील (बेळवले) , नेताजी भोसले, महादेव कोईगडे, महेश (निळपण), रघुनाथ पाटील (गोरंबे), सुभाष पाटील (पिंपळगाव), कुलदीप खोत (चांदेकरवाडी), शिवाजी संकपाळ वस्ताद (बुद्धिहाळ), शहाजी हांडे (तळदगे), संदेश माकने वस्ताद (यळगुड), श्रावण पाटील (सुरुपली), स्वागत पाटील (खेबवडे), संदीप खोत, सागर शिंदे (नुल, गडहिंग्लज), पैलवान तानाजी कुराडे (नंदगाव) तसेच महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील शेकडो कुस्ती प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments