सांगोला याठिकाणी विजेचा शॉक लागून एका वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहिल्यानगर येथे पोलवर चढून विजेचे काम करीत असताना कंत्राटी कामगार शुभम शितोळे यास विजेचा जबर धक्का बसून तो पोलवरच ठार झाला. ही घटना समोर येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात नेमका कसा घडला, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
अचानक प्रवाह चालू स्पार्क होऊन शुभमचा मुत्यू..
अहिल्यानगर येथे शुभम शितोळे हे पोलवर चढून विजेचे काम करीत असताना अचानक प्रवाह चालू होऊन स्पार्क तयार झाला होता या स्पार्क मुळे शुभम यास विजेचा जबर धक्का बसून तो पोलवरच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
जेसीबीची मदत घेऊन खाली काढले.
विजेचा झटका बसल्यानंतर वायरमन शितोळे यांचा मृतदेह विजेच्या खांबावरच लटकून राहिला होता. यानंतर गावातील काही नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्यानं हा मृतदेह खाली उतरवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. शुभम च्या घरी आई वडील व बहीण असा परिवार आहे शुभम हा घरचा कर्ता पुरुष असल्यामुळे त्याच्यावर घराची जबाबदारी होती.
0 Comments