केंद्रातील मोदी सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आता संभ्रम दूर झाला आहे. मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कायद्यामुळे आता राज्यांना अधिकार असणार आहेत. ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं सांगतानाच ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी, असं आवाहन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलं आहे.
मराठा समाजाला मागास ठरविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. राज्य मागासवर्गीय आयोगात जे जातीय लोक आहेत त्यांना हटवावे. नाही तर जातीय अन्याय होऊ शकतो. तसेच राज्य मागासवर्गीय आयोगात सर्व जातीच्या सदस्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
येत्या १९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. वडाळा येथे ही बैठक होणार. या बैठकी आधी सरकारने आरक्षणावर तोडगा काढावा. सरकारने १८ ऑगस्टपर्यंत तोडगा काढला नाही तर सरकारची झोप उडवू, असा इशारा देतानाच मराठा समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत पुढील भूमिका ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नितीन गडकरींची मोठी घोषणा, वाहतूक होणार सुखकर
आरक्षणाला ५०% ची मर्यादा ही आजची नाही. ५०% च्या आतही मराठा समाजाला आरक्षण देता येईल. आयोगामार्फत सर्व्हे करत मार्ग काढता येईल. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायची असेल तर करावी, असं सांगतानाच नाकर्तेचे नाव म्हणजे अशोक चव्हाण आहे. सरकारची मानसिकता लोकांना सामोरे जाण्याची नाही, असंही ते म्हणाले.
0 Comments