पिंपरी येथे कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन



पिंपरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नाई  कृषी महाविद्यालय येथील  कृषीदूत श्रीराम शिवाजी पाटील यांच्या वतीने पिंपरी येथे आयोजित कृषी सल्ला केंद्राचे उदघाटण येथील श्री काकासाहेब काटमोरे व गावातील काही शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत पार पडले. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकर्यासाठी जागरुकता केंद्र सुरु केले असून त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळणार आहे.

 या सल्ला केंद्रतून माती परीक्षण कसे करावे, सेंद्रिय शेतीचे महत्व,पिकांवरील
रोग व किटक नियंत्रण, प्रगत सिंचन प्रणाली, बीज प्रक्रिया व उगवण क्षमता, शेतीपूरक व्यवसायांचे  महत्व तसेच शेती मध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीदूत श्रीराम पाटील यांनी दिली. 

या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज  अध्यक्ष मा. जयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाचे समन्वयक - डॉ . डी.पी. कोरटकर,प्राचार्य आर. जी. नलवडे,  कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे ,कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर.अडत, प्रा. डी.एस.मेटकरी,डाॅ.डी.एस.ठवरे
यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी कार्यक्रमास श्री काकासाहेब काटमोरे,बाळासाहेब कशीद,मोहन सुतार, शरद काटमोरे, दिग्विजय काटमोरे, दादा काटमोरे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments