प्रियंका चोप्राने BFला लपूनछपून आणलं घरी; मावशीने पकडताच…अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या अभिनयासाठी, ग्लॅमरसाठी भारतातच नाही तर आता जगभरात ओळखली जाते. तिचे लाखो चाहते जगभारात आहेत. प्रियंका तिच्या प्रोफशनल लाइफ इतकीच तिच्या पर्सनल लाइसाठीही  नेहमीच चर्चेत राहीली आहे. तिच्या आयुष्यात असे अनेक किस्से घडले आहेत ज्यामुळे ती चर्चेत राहिली आहे. याच सगळ्या आठवणी तिने तिच्या पुस्तकातही लिहिले आहेत, याच वर्षी तिचं पुस्तक ‘अनफिनिश्ड’ प्रकाशित झालं आहे.

प्रियंकाने पुस्तकात असाही किस्सा सांगितला आहे, जो तिच्या बॉयफ्रेंडशी निगडीत होता व ती शाळेत होती. खूपच कमी लोक जाणतात की प्रियंका १३ वर्षांची असताना शाळेसाठी आपल्या मावशीकडे अमेरिकेला गेली होती. त्यावेळचा एक किस्सा तिने आपल्या पुस्तकात मांडला आहे.

तिने म्हटलं आहे, ‘एके दिवशी मी आणि बॉब आरामात एकमेकांचा हात पकडून टीव्ही पाहत होतो. तेव्हा मी अचानक पाहिलं की, मावशी शिड्यांवरून चालत येत आहे. मी पूर्णपणे घाबरले होते. दुपारचे दोन वाजले होते. आणि ती तिच्या येण्याची वेळ नव्हती. बॉब बाहेर देखील जाऊ शकत नव्हता.

त्यामुळे मी तोपर्यंत त्याला आतमध्ये राहायला सांगितलं, जोपर्यंत मी मावशीला सामान आणायला बाहेर पाठवत नाही. पण आमच्या म्हणण्यानुसार काहीच झालं नाही.’

पुढे मावशीच्या चोरी लक्षात आल्यानंतर प्रियंकाने सांगितलं, ‘मावशीने मला कपाट उघडण्यासाठी सांगितलं. मी पूर्णपणे घाबरले होते आणि कापत होते. कारण मी कधीच तिला इतक्या रागात पाहिलं नव्हतं. मी कपाटाचा दरवाजा उघडला तर त्यातून तो बाहेर आला. नंतर मावशीने ही गोष्ट आईला सांगितली.’ 

यानंतर मात्र प्रियंकाला भारतात परत यावं लागलं होतं. तीन वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर ती भारतात परतली होती. पुढील शिक्षण तिने भारतातच पूर्ण केलं होतं. प्रियंकाच्या या पुस्तकालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Post a Comment

0 Comments