विचाराशिवाय माणूस जोडला जाऊ शकत नाही - देवा चव्हाण


परंडा/प्रतिनिधी:

आषाढी एकादशी पर्व निमित्ताने मौजे हिंगणगाव (बु) येथे छत्रपती संभाजीराजे  प्रतिष्ठाण महाराष्ट्र,प्रहार संघटना महाराष्ट्र परंडा, अखिल भारतीय छावा युवा संघटना महाराष्ट्र परंडा यांच्या वतीने पायी दिंडी सोहळा,गुणवंत विद्यार्थी सत्कार,प्रबोधनकार देवा चव्हाण यांचे व्यसनमुक्ती मार्गदर्शनपर व्याख्यान, फराळ वाटप, वृक्षदान,कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सकाळी ८ वाजता लहान बालके व ग्रामस्थ सहभागातून पायी दिंडी सोहळ्याने संपूर्ण गाव दुमदुमून गेला. त्यानंतर गावातील ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.तसेच समाजप्रबोधक देवा चव्हाण यांचे व्यसनमुक्ती मागर्दनपर व्याख्यान संपन्न झाले.

विचारांशिवाय माणूस माणूस जोडला जाऊ शकत नाही,पुस्तक वाचून मस्तक सुधारा,व्यसणापासून दूर व्हा असे परखड विचार आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात चव्हाण यांनी मांडले.अखिल भारतीय युवक छावा संघटना परांडा,प्रहार संघटना परंडा यांच्या वतीने ५ झाडे देऊन वृक्षदान करण्यात आले.याप्रसंगी छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्यचे पै.नानासाहेब पवार, जयसिंग लिमकर,अखिल भारतीय युवक छावा संघटना परांडा तालुकाध्यक्ष भरत ननवरे,महेश्वर खराडे,श्रीराम खराडे,प्रहार संघटना तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील,श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील,अखिल भारतीय छावा संघटना बार्शी तालुकाध्यक्ष धीरज शेळके, दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष अमोल शेळके,तालुकाध्यक्ष तानाजी घोडके,बालसंस्कार केंद्र परांडयाचे सुर्यवंशी,ग्लोबल इंग्लिश परांड्याचे गोरख मोरजकर,फिनिक्स वक्तृत्व क्लासेस परांड्याचे रवी शिंदे ,
सामाजिक कार्यकर्ते आप्पा तरटे,सरंपंच संतोष गोरे,उपसरपंच महेश कदम उपस्थित होते.तसेच महेश ठोंगे,नाना देवकर,अतुल ठोंगे,प्रकाश ठोंगे,गणेश नवले,राज ईके,विलास ठोंगे,तुकाराम कुरुंद,शिवाजी सुतार,पुरुषोत्तम कुलकर्णी,सुधाकर ठोंगे व समस्त हिंगणगाव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments