बार्शी! दफनभूमीसाठी जागा द्या ; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मृतदेहावर करणार अंत्यसंस्कार ; तांदळवाडी ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा


बार्शी/प्रतिनिधी:

 गावात कोणीही मृत झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोणतीही पूर्वकल्पना न देता तो मृतदेह दफन करण्यात येईल. असा इशारा तांदुळवाडी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

तांदुळवाडी गाव बार्शी तालुक्यातील ढाळे पिंपळगाव या मध्यम लघु प्रकल्पामुळे बाधित झालेले गाव आहे. तांदळवाडी गावाच्या पुनवर्सन वसाहतीत गावठाण मध्ये भूसंपादन होऊ सुमारे वीस वर्ष होऊनही दफनभूमीची जागा मिळालेली नाही. दफन भूमीची सुविधा ही अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य अशी गरज आहे. मात्र सध्या गावठाणात दफनभूमीची जागा उपलब्ध नाही.

 ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह दफन करण्यास ग्रामस्थ चालले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने दफनभूमीसाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन अद्याप पर्यंत पूर्ण झालेले नाही.

त्यामुळे नाईलाजाने यापुढे गावात जर कोणी व्यक्ती मृत झाली तर त्याचा दफनविधी हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात केला जाईल असा इशारा तांदुळवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर , तहसीलदार बार्शी ,बार्शी व पांगरी पोलिस स्टेशन यांनाही देण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र गरड , हारून शेख , मुजाहिद शेख , ताजुद्दीन शेख उमराव शेख , शरीफ शेख , आदम शेख , मलीक मुजावर , अस्लम शेख आदी लोकं उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments