डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या उपाध्यक्षपदी विजय कोरे तर सचिवपदी विनोद ननवरे ची नियुक्ती


बार्शी/प्रतिनिधी;

डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना महाराष्ट्र यांचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तथा संपादक राजा माने प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली, त्यामध्ये संघटनेचा आढावा घेण्यात आला.

 विजेचा टाईम चे मुख्य संपादक विजय कोरे यांना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तर माझा न्यूजचे संपादक विनोद ननवरे यांची सचिव पदी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष राजा माने म्हणाले की खूप मोठी व अनुभवी  लोकांचा यामध्ये स्वतःहून सहभाग होऊन सर्व माध्यमातून या संघटनेचे कौतुक व स्वागत होताना दिसतंय भविष्यात खूप व्यापक, फक्त राज्यात नाही तर पूर्ण देशांमध्ये या संघटनेचे  कार्य आणि उद्देश सर्वसमोर ठेवण्यात अनेक मोठ्या हस्ती पुढे येत आहेत.

 डिजिटल मीडियामुळे अनेक विषय सहज घरोघरी बालकापासून ते वृद्धापर्यंत अगदी काही काळात कसे पोहोचते याचे विश्लेषण संतोष सुर्यवंशी यांनी केले, तसेच  संघटना झाल्यापासून काम करताना यानाऱ्या अडचणी   वर मात करणे सोपे झाले असे संघटनेचे तालुका सल्लागार मयूर गलांडे म्हणाले, जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे ती मनापासून पूर्णत्वास नेऊ असे बोलताना विजय कोरे व विनोद ननावरे म्हणाले. तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना बार्शी सल्लागार मयूर गलांडे, तालुका अध्यक्ष टिंकू पाटील, उपाध्यक्ष इरशाद शेख, सचिव दिनेश मिटकरी, सहसचिव धीरज शेळके, खजिनदार आमीन गोरे यांनी सुद्धा बार्शी तालुक्यातील संघटनेचे काम जोमाने करण्याचे आश्वासन दिले.

मल्लिनाथ धारूरकर, विषाल मोरे, शंकर गव्हाणे तात्या माळी ,बाळासाहेब लोखंडे इत्यादी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments