पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी महिलेचा भयानक कट



एखाद्या हिंदी चित्रपटाची थ्रिलर स्टोरी असावी अशी हुबेहुब घटना वास्तव्यात घडली आहे. एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एक भयानक प्लॅन आखला. तिने तो प्लॅन फक्त आखला नाही तर त्यानुसार सर्व नियोजन करुन तो प्लॅन पूर्ण करुन आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेतला.

पाकिस्तानच्या कबायली येथील बाजौर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. आरोपी महिलेचा पतीचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं होतं. पण त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की हत्या झाली हे स्पष्ट झालं नव्हतं. विशेष म्हणजे तिच्या पतीचा जवळचा मित्र गुलिस्तान खान यानेच त्याला विषारी इंजेक्शन देऊन त्याची हत्या केल्याची माहिती तिला मिळाली.

आपल्या पतीची हत्या झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलेने त्याचदिवशी त्या हत्येचा बदला घ्यायचा, असं मनाशी ठाम केलं. त्यानंतर महिलेने गुलिस्तान खानला पैसे आणि संपत्तीचं लालच देऊन लग्नासाठी होकार देण्यास भाग पाडलं. अखेर दोघांनी लग्न केलं.

लग्नानंतर काही दिवसांनी महिलेने गुलिस्तानला स्वत:च्या संरक्षणासाठी घरात एक पिस्तूल हवी, असं सांगितलं. त्यानंतर गुलिस्तान याने पिस्तूल विकत घेतली. त्यानंतर आरोपी महिलेने मध्यरात्री संधी साधून गुलिस्तान याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली.

महिलेने गुलिस्तान याच्या हत्येनंतर पोलिसांना दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने आपल्या पतीची हत्या केली, असं सांगितलं. पण पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. यावेळी तिने पोलिसांना सविस्तर घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी तिला कर्टात हजर केलं. त्यानंतर तिला कोठडीत पाठवण्यात आलं.

Post a Comment

0 Comments