"कॉलेजनी प्रथम वर्ष लेखी परीक्षेचे गुण संगणक प्रणालीत १७ मे २०२१ पर्यंत सादर करावेत :परीक्षा संचालक श्री.गजानन पळसे"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० च्या बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी व इतर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होत आहेत. तरी त्या अनुषंगाने महाविद्यालयाने ऑनलाईन पद्धतीने खाली नमूद केल्याप्रमाणे प्रथम वर्षातील प्रथम सत्र व द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांची नोंद १७ मे २०२१ पर्यंत संगणक प्रणालीत भरून सादर करावेत.

Web Page ➡️ online.unishivaji.ac.in

Tab ➡️ Links for College (Cluster/Part -l,Sem-1&2 College Level CAP B.A./B.Com/B.Sc.etc)

Link ➡️ Exam at college - Theory Mark Entry Oct-2020(B.A.,B.Com.,B.Sc.& Engg./Pharmacy/Arch/Law etc)

तरी वरील प्रमाणे ज्या महाविद्यालयांनी गुणांची नोंद केली नाही ;अशा महाविद्यालयांनी त्वरित सदर पद्धतीने गुणांची नोंद करून संबंधित परीक्षा विभागास कळवावे तसेच गुणांची हार्ड कॉपी विद्यापीठास रजिस्टर पोस्टाने पाठवून द्यावी. प्रात्यक्षिक परीक्षेच्या गुणांच्या नोंदी या प्रचलित पद्धतीने करावयाचा आहेत अशा प्रकारची माहिती परीक्षा विभागाच्या १२/५/२०२१ च्या परिपत्रकानुसार प्राप्त झाली आहे.
      
तरी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या सर्व महाविद्यालयानी याची पूर्तता करून परीक्षा विभागास सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments