पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पैशाची मागणी केली नसल्याचे निष्पन्न; बार्शीच्या सराफाविरोधात गुन्हा दाखल


 बार्शी/प्रतिनिधी: 

राज्यात कोरोना संसर्ग,प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद करावेत असे  असताना सराफाने दुकान उघडले होते, दुकान पोलिसांनी सील केले ही स्वतःवरील कारवाई टाळली जावी यासाठी पोलिस निरीक्षकांनी पाच लाख रुपये मागितले अशी व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात प्रसारित करुन गृहमंत्री, गृह विभागाची बदनामी केल्याप्रकरणी सराफांविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी येथील सराफ अमृतलाल गुगळे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून पोलिस उपअधिक्षक अभिजित धाराशिवकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १७ एप्रिल रोजी घडली होती, तपासानंतर ८ मे रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शासनाकडूून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अमंलबजावणी सुरु असताना १७ एप्रिल रोजी गस्तीवरील पोलिसांना चांदमल ज्वेलर्स दुकान आदेशाचे उल्लंघन करुन सुरु असल्याचे दिसले. त्याचदिवशी दुकानातील उपस्थित चालक अमृतलाल गुगळे यांचेवर पोलिस कर्मचारी उत्तरेश्वर घुले यांनी आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग, कोविड १९ विनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला व दुकान ३० दिवसांसाठी सील करण्यात आले होते.

सराफ गुगळे यांनी १८ एप्रिल रोजी स्वत:ची व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी गुगळे यांच्या पत्रकार मित्रांकडे त्यांचेवरील कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली, त्यास गुगळे यांनी नकार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक गिरीगोसावी गुगळे यांना म्हणाले की, आम्हाला गृहमंत्र्यांपर्यंत हप्ते पोहचवावे लागतात वैगेरे असा व्हिडिओ क्लिपमध्ये उल्लेख होता.

राज्याचे गृहमंत्री यांचे नाव घेऊन पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे विरुद्घ गंभीर स्वरुपाचे आरोप गुगळे यांनी प्रसार माध्यमाद्वारे केल्यामुळे पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वये या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मला दिले होते. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली असता पोलिस निरीक्षक, कारवाईतील अंमलदार, गुगळे यांचेसाठी भेटलेले पत्रकार विजय निलाखे, योगेश लोखंडे, राजकीय व्यक्ती राजेंद्र गायकवाड यांचे जबाब नोंदवले आहेत.

 पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. आपल्यावरील कारवाई टाळली जावी यासाठी पुर्वग्रहदूषित पणे पोलिसांची बदनामी होईल अशी व्हिडिओ क्लिप समाज माध्यमात प्रसारित करुन महाराष्ट्र पोलिस दलाची, गृहमंत्री, गृहविभाग यांची जाणीवपूर्वक बदनामी केली म्हणून माझी अमृतलाल गुगळे यांचे विरुद्ध सरकारकडून फिर्याद आहे. असे अभिजित धाराशिवकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments