सांगोला येथे २६ कैद्यांना कोरोनाची लागण...


सांगोला/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यात कोरोना परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आता कैद्याही बसत आहे. सांगोला सब कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. २६ कैद्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव आढळले आहे. सांगोला पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

सांगोला सब कारागृहात कोरोनाचा शिरकाव..
जिल्ह्यामध्ये रोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यात सांगोला तालुक्यातील कोरोनाची दुसरी लाट दिसून येत आहे. दुसऱ्याला लाटेत सांगोला सब कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. साठ पैकी सुमारे २६ कैदी कोरोना ग्रस्त झाले आहे. त्या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी सांगोला येथील सिंहगड महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आली आहे. तर इतर कैद्यांना विलगीकरण कक्षा ठेवण्यात आले आहे..

पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे कोरोना आटोक्यात..
जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. यातच सांगोला सब कारागृहात कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन दिवसापूर्वी तीन कैद्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांचा अहवाल हा पॉझिटिव आल्यामुळे त्यांना कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी अजून काही कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून २३ कैदी हे बाधीत आढळले आहेत. पोलीस प्रशासनाकडून योग्य दक्षता घेतल्यामुळे कोरोना आटोक्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments