पत्रकार रणजीत महादेव पाटील यांची परंडा तालुकाध्यक्ष पदी निवड


परंडा/प्रतिनिधी:

स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार रणजीत महादेव पाटील यांची परंडा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार,उपाध्यक्ष  गौरव शेलार यांनी रणजीत महादेव पाटील यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघ 
परंडा तालुकाध्यक्ष पदी निवड पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. 

अन्याय अत्याचार,भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न व कोरोना काळात निर्माण होणाऱ्या अडचणी आपल्या लेखणीतून सरकार दरबारी मांडण्यासाठी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रणजीत महादेव पाटील यांनी
श्रीमंतराजे प्रतिष्ठाण संस्थापक,शंभुसेना महाराष्ट्र उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष,महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन,भारत- महाराष्ट्र एन जी ओ डेव्हलपमेंट उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष इ.संस्थेच्या माध्यमातून समाजकार्याचा ठसा उमटवला आहे. पाटील  यांचे सर्व सहकारी मित्र परिवार यांच्याकडून शुभेच्छा व अभिनंदन  वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments