बार्शी! जगदाळे मामा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उचलले एक पाऊल; सकाळी मिळणार मोफत सकस आहार


बार्शी/प्रतिनिधी:

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जीवन गौरव समितीच्या वतीने जगदाळे मामा रुग्णालयात आपल्या जीवावर उदार होऊन कोरोना रुग्णांची काळजी घेत आसलेल्या सर्वच डॉक्टर, नर्स, तसेच इतरही सर्व कामगारांना कोरोनाच्या संक्रमण काळा पर्यंत सकाळी मोफत पौष्टक सकस आहार देणार आहे. 

३० मार्च पासून या उपक्रमास समितीने सुरवात केली असून पहिल्या दिवशी बार्शीचे न्यायालयाचे प्रमुख न्यायधिश तेजवंतसिंग संधू यांच्या हास्ते या कोरोनायोध्दांना सकस आहाराचे वाटप केले. या वेळी डॉ. सावंत, जयंत देशमुख विधी तज्ञ राहुल झालटे, तसेच जीवन गौरव समितीचे पदाधिकारी व सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस व विधी तज्ञ विकास जाधव,वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष धनंजय जगदाळे, पुढारीचे वार्ताहर गणेश गोडसे, जीवन गौरव समितीचे काका जगदाळे, आबा मुकटे,महादेव ढगे, तसेच जगदाळेमामा जीवन गौरव समितीचे इतरही पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या प्रमाणातच रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. या भयावह परस्थिती मध्ये ड़ॉक्टर व सर्व आरोग्य कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन खऱ्या आर्थाने रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे हा आरोग्य कर्मचारी वर्ग देखील दैवता पेक्षा कमी नाही. यांचे देखील आरोग्य सदृढ राहिले पाहिजे, त्यासाठी त्यांचे आरोग्य जपण्याचे काम कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे जीवन गौरव समिती या उपक्रमाव्दारे करनार आहे, हे खरेच कौतुकास्पद असल्याचे मत बार्शी न्यायालयाचे प्रमुख न्यायधिश तेजवंतसिंग संधू यांनी व्यक्त केले.

राहुल झालटे या उपक्रमावेळी बोलताना म्हणालेकी, या संक्रमणाच्या वाढत्या काळात वैद्यकीय अधिकारी व त्यांचा कर्मचारी वर्ग यांचे आरोग्य देखील सुरक्षित राहणे गरजेचे आहे. आज त्यांची देखील या परस्थितीत मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे, हेळसांड होत आहे. जर त्यांचे आरोग्य उत्तम राहिले तरच ते इतर रुग्णाचे देखील आरोग्य जपण्याचे काम उत्तम रित्या करु शकतात. त्यामुळे जगदाळेमामा जीवन गौरव समितीने सुरु केलेला हा उपक्रम निश्चितच लाभदायी ठरेल.

आरोग्य कर्मचारी व डॉक्टर हे खऱ्या आर्थाने या परस्थितीत दैवतापेक्षा कमी नाहीत. या संकटकाळी रुग्णांची सेवा करत आसताना त्यांचीदेखील सेवा सुविधा व त्यांचे देखील आरोग्य जपणे , सुरक्षित राहणे नितांत गरजेचे आहे. जर ते सूरक्षित राहु शकले तरच ते इतरांना देखील सुरक्षितता देऊ शकतील या भावनेने जगदाळे मामा जीवन गौरव समितीने हा उपक्रम चालु केला असल्याचे मत धनंजय जगदाळे यांनी व्यक्त केले. या उपक्रमाची धुरा संभाळत असलेले काका जगदाळे म्हणालेकी, जो पर्यत कोरोनाचा संक्रमण काळ आहे तोपर्यंत या कर्मचारी वर्गाला कडधान्य, अंडी, पोहे, उपीट शीरा , खिचडी तसेच त्यांच्या मागणीनुसार इतरही सकस नाष्ट्याची सोय केली जाणार आहे. यावेळी उपस्थित असलेले न्यायाधिश संधु यांचे व सर्व मान्यवरांचे आभार विकास जाधव यांनी मानले.

कोरोनाचा संक्रण काळापर्यंत पोष्टीक व सकस आहार त्यांच्या मागणीनुसार पुरवला जाणार आहे. यासाठी गौरव समिती स्वखर्चाने व मोफत ही सोय उपलब्ध करुन देत आहे.अशी माहिती कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जीवन गौरव समितीचे अध्यक्ष संजय(बापु) जगदाळे यांनी दिली, लाॅकडाऊन मुळे सर्व उपहार गृहे बंद असल्याने हा उपक्रम सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Post a Comment

0 Comments