ममता बॅनर्जी ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथरा


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणक्यात विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक देखील साधली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडून देण्यात आली आहे.


Mamata Banerjee to take oath as Chief Minister on 5th May: West Bengal Minister and senior TMC leader Partha Chatterjee pic.twitter.com/KzWVXzbu0d

— ANI (@ANI) May 3, 2021

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा शपथविधी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडणार आहे. ममता बॅनर्जी आज रात्री ७ वाजता राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर ते ५ मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेद्वारे हि माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments