Rashmika Mandanna Birthday: "रश्मिका मंदानाच्या हसऱ्या चेहऱ्यामागं आहे टोचणारं दुःख"


 अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या चाहत्यांची संख्या कोट्यावधी आहे. अवघ्या काही काळातचं यशाच्या शिखरावर पोहचलेल्या २५ वर्षीय अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी लाखो चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

रश्मिकाचा जन्म कर्नाटकच्या विराजपेट याठिकाणी झाला होता. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यामध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे. खरंतर महाविद्यालयीन काळापासून रश्मिकाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. त्या काळात तिने बर्‍याच टीव्ही जाहिरातीत काम करायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर २०१५ मध्ये, तिने बेंगळुरूमध्ये झालेला एक टॅलेंट हंट जिंकला. हा पुरस्कार तिच्या कारकीर्दीचा टर्निंग पाँइट ठरला. 

या चित्रपटाच्या सेटवर रश्मिका मंदाना आणि अभिनेता रक्षित शेट्टी यांच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात होऊ लागलं होतं. दरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. त्यावेळी रश्मिकानेही आपण रक्षितला डेट करत असल्याची माहिती सार्वजानिक केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये या दोघांचा साखरपुडाही पार पडला होता. पुढे सर्वकाही व्यवस्थित चालू होतं, पण सप्टेंबर २०१८ मध्ये अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या. जवळच्या काही लोकांनी सांगितलं की समन्वयाच्या अभावामुळे ते दोघं वेगळे झाले आहेत.

तेव्हा रक्षितनं आपल्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की, 'प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. जेव्हा असं होईल तेव्हा आपल्या  सर्वांना सत्य कळेल.' रक्षितनं हे वक्तव्य २०१८ मध्ये केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत तीन वर्षे उलटली. मात्र रक्षित किंवा रश्मिका या दोघांपैकी कुणीही त्या सत्याबद्दल कधीच काही बोलले नाहीत.

रश्मिका मंदाना लवकरच अमिताभ बच्चन सोबत 'गुड बाय' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' मध्ये देखील दिसणार आहे. रश्मिका सध्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटासाठीही काम करत आहे.

Post a Comment

0 Comments