महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामासाठी गडकरींनी केली २७८० कोटींची घोषणा


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधींचा निधी जाहीर केला आहे. तशी माहिती त्यांनी ट्विट करता दिली आहे. महाराष्ट्रातील या कामांसाठी २७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आलाय.

नितीन गडकरी यांनी गुरुवारी सकाळी ११ ते सव्वा अकरादरम्यान केलेल्या वेगवेगळ्या ट्विटमध्ये प्रगतीका हायवे या हॅशटॅग अंतर्गत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग १६६ ई वरील गुहार चिपळूणला जोडणाऱ्या रस्त्याचं काम करण्यासाठी १७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं गडकरी यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.

 तसेच, जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ७५३ जे च्या विस्तारीकरणासाठी २५२ कोटी रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर गडचिरोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ सीवरील २६२ किमी ते ३२१ किमीच्या अंतरामध्ये १६ लहान मोठे पूल बांधण्यात येणार असल्याची घोषणाही गडकरींनी केलीय. यासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय.

Post a Comment

0 Comments