बार्शी प्रतिनिधी :
बार्शी शहरात व तालुक्यातून गेल्या कित्येक महिन्यांपासून वाळू उपसा अवैध रित्या वाहतूक होत असून कित्येक वेळा पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनी श्री शिवाजी जायपत्रे हे मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांवर अळा घालण्याचे काम करीत आहेत.
आज दिनांक ०३/०४/२०२१ रोजी श्रीपत पिंपरी ते भोइंजे च्या मधोमध असणारा घोर ओढा येथील वाळूचा उपसा खूप मोठ्या प्रमाणात चालू असल्याने तेथील स्थानिक शेतकरी वाळू तस्करी दारांवर खूप संताप व्यक्त करत आहेत.
परंतु ,आज पहाटे च्या सुमारास एक ट्रॅक्टर वाळू भरून घेऊन गेला असता,ती ट्रॉली / वाळू अज्ञात ठिकाणी टाकून दुसऱ्या वेळेस ट्रॉली भरण्यास आला.त्यावेळी तेथील स्थानिक शेतकरी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फोन करून सविस्तर माहिती ठाणे अंमलदार उंदरे यांना सांगितली असता, त्यांनी तात्काळ पोलीस पथक पाठवून त्या ट्रॅक्टर चालकासह अन्य व्यक्तींना ताब्यात घेऊन पाहणी केली असता ट्रॉली मध्ये अवैध रित्या भरलेली वाळू तस्करी करताना आढळून आले व वाळू भरण्यासाठी साहित्य हि जप्त करण्यात आले.
विशाल नाना पाटील वय - २३ वर्षे धंदा- ट्रक्टर चालक रा. श्रीपतपिंपरी ता. बार्शी व सौरभ बाबु पिंगळे वय २० व धंदा- मजुरी रा. श्रीपंतपिपरी ता. बार्शी असे असून त्यानंतर सदर ट्रक्टर चालक नावे- विशाल नाना पाटील यांचेकडे सदर वाहन मालकाचे नाव विचारले असता - महेश कल्याण ताकभाते वय २५ वर्षे असे असल्याचे सांगीतले आहे ५,४९००० रू येणेप्रमाणे वरील वर्णनाचा ट्रॅक्टर-ट्रॉली व वाळू सदर ठिकाणी मिळून आल्याने वरील आरोपींविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
0 Comments