बार्शी! जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलला; कर्मवीर जलतरण तलाव चालकावर दंडात्मक कारवाई


बार्शी/प्रतिनिधी:

 जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार बार्शी शहरात शनिवार आणि रविवार सर्व दुकाने आणि अस्थापने (अत्यावश्यक वगळून ) बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, श्री शिवाजी महाविद्यालयातील कर्मवीर जलतरण तलाव सुरूच असल्याचे आढळून आले. त्यामुळे, संबंधित तलाव चालकावर कोविड नियमाचा भंग केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

नगरपरिषद मुख्या धिकारी अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व बाजारपेठ बंद असताना सुद्धा शिवाजीनगर भागातील कर्मवीर जलतरण तलाव आज रोजी चालू होता. तसेच, तलाव परिसरात अनेकजण विना मास्क आढळून आले आहेत. या विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून संबंधित चालकाकडून दंडात्मक कारवाई म्हणून ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, सदरची धडक कारवाई विभागाच्या प्रमुख ज्योती मोरे, स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद व नितीन शेंडगे तसेच वाहन चालक दीपक खुडे यांनी केलेली आहे. त्यामुळे, विनाकारण कारवाईचा बडगा रोखायचा असेल, तर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments