चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?; हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला


कोल्हापूर/प्रतिनिधी:

 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल सुटला आहे. चंद्रकांत पटालांवर सडकून टीका करताना चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले आहे. मुश्रीफ यांनी पाटील यांचा आज खरपूस समाचार घेतला आहे.

ते आज कागलमध्ये मुश्रीफ प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपचे आयटीसेलचे प्रमुख नविनकुमार जिंदाल यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरून मुश्रीफ यांनी माफी मागा नाही तर परिणामांला सामोरे जा, असा इशारा भारतीय जनता पक्षाला मुश्रीफ यांनी  दिला होता.
त्यावर आमदार पाटील म्हणाले होते की, मुश्रीफ यांना काय म्हणायचे ते म्हणू दे, आम्ही आजीबात माफी मागणार नाही. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी हे विधान केले. 

मी फक्त मीडियासेलचे प्रमुख जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली . याप्रकरणी भाजपाने  केवळ माफी मागावी अशी मागणी केली होती. पण चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती आली कुठून? असे मुश्रीफ यावेळी म्हणाले. आघाडी सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, कसलेही व काहीही आरोप करु देत, महाविकास आघाडी सरकार हे अजून  २५ वर्षे चालणार आहे. अशा घटनाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असेही मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments