कमी कपड्यांमुळे नव्हे, विकृत विचारांमुळे रेप होतात'; ट्रोलर्सवर भडकली अभिनेत्री


अमायरा दस्तूर ही भारतीय सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.तिनं बॉलिवूड सोबतच तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अमायरा आपल्या जबरदस्त डान्स मूव्ह आणि मादक अदांसाठी प्रसिद्ध आहे.चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.यावेळी देखील तिनं असाच एक ग्लॅमरस व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.मात्र हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी तिच्यावर संतापले.

 तिच्या तोडक्या कपड्यांवरुन तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करु लागले.“अशा कपड्यांमुळंच मुलींचे बलात्कार होतात. सार्वजनिक ठिकाणी फिरताना असे तोकडे कपडे वापरु नये.” अशा आशयाची प्रतिक्रिया देत एकानं तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.या ट्रोलर्सला अमायरानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. “मुलींचे बलात्कार तोकड्या कपड्यांमुळं नव्हे तर विकृत प्रवृत्तीमुळं होतात.” असं जोरदार प्रत्युत्तर तिनं दिलं.तिची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर  सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी तिच्या या प्रतिक्रियेवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

या ट्रोलर्सला अमायरानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. “मुलींचे बलात्कार तोकड्या कपड्यांमुळं नव्हे तर विकृत प्रवृत्तीमुळं होतात.” असं जोरदार प्रत्युत्तर तिनं दिलं. 

Post a Comment

0 Comments