अनिल देशमुखांचा राजीनामा देणार ? सिल्व्हर ओकवर शरद पवार,अजित पवार,देशमुख बैठक सुरू!


राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी तसे पत्र लिहित ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिले होते. 

मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे.

या निर्णयानंतर पुन्हा एकदा अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सुरु झाली आहे. या सगळ्या मुद्यावरच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर महत्वाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थितीत आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप अतिशय गंभीर असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. या सगळ्यावरुन आता राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून शरद पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. अनिल देशमुख स्वत:हून राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार हे ही पाहणे महत्वाचे असणार आहे.

Post a Comment

0 Comments